सिंडिकेट







सिंडिकेट  
Action Crime Thriller

लेखक: निरंजन ओक








                                                       
(This book is strictly for Adults)



प्रस्तुत कादंबरीतील लिखाणाचे सर्व प्रताधिकार लेखकाच्या स्वाधीन असल्याने यातील मजकूर मूळ खंडित वा संक्षिप्त अशा कोणत्याही स्वरूपात प्रसिद्ध करता येणार नाही. लेखकाच्या पूर्व-परवानगी शिवाय तो इतर भाषेत अनुवादित वा  रुपांतरीत करता येणार नाही.

संपर्क: niranjan.oak@gmail.com

प्रस्तुत कथानकात उल्लेख केलेली काही स्थळे भौगोलिक अस्तित्वात असली तरी कथानकात त्या स्थळी घटलेल्या घटना काल्पनिक आहेत. कथानकातील सर्व पात्रे पूर्णतः काल्पनिक आहेत. प्रत्यक्षातील कोणत्याही घटनेशी अथवा व्यक्तीशी अथवा जागेशी काही साधर्म्य आढळलेच तर तो केवळ योगायोग समजावा.   





  • प्रकरण १: इन्स्पेक्टर सावंत
  • प्रकरण २: पनवेल लॉकप
  • प्रकरण ३: कमला
  • प्रकरण ४: सरन्यायाधीश नितीन एकबोटे
  • प्रकरण 5: जय-अंबे महीलाश्रम
  • प्रकरण ६: प्रेमाचा अंकुर
  • प्रकरण ७: तपासाची नवीन दिशा
  • प्रकरण ८: प्रेमाचे इंद्रधनुष्य
  • प्रकरण ९: पुनःश्च सब इन्स्पेक्टर राणे
  • प्रकरण १०: मास्टर प्लॅन
  • प्रकरण ११: कालिमाता




प्रकरण : इन्स्पेक्टर सावंत


पाण्यात गेलेली म्हैस आणि मुंबईचा ट्रॅफिक जाम काही केल्या हलत म्हणून नाहीत. आणि त्यात जर तुफानी पावसाची साथ असेल तर बघायलाच नको. सायन च्या अश्याच एका मेगा ट्रॅफिक जाम मधून बाहेर पडल्यावर इन्स्पेक्टर सावंत यांनी त्यांच्या ड्रायव्हरला जीप जोरात हाणायला सांगितली. पावसाचे आडवे तिडवे फटकारे खात रस्त्यावरील चिखल बेफिकीरपणे तुडवत गाडीने मुलुंड पोलिस स्टेशन चा रस्ता धरला.
साहेब विक्रोळी ला पण ट्रॅफिक जाम आहे”  ड्रायव्हर घोरपडे वैतागून म्हणाला.
हा आग्रा रोड म्हणजे वैताग आहे साला. एक काम कर. इथे राईट मार आणि जोगेश्वरी  विक्रोळी लिंक रोड ला घे. एकदा इस्टर्न एक्स्प्रेसवे ला लागलो की तिथून मुलुंड ला जाऊइन्स्पेक्टर सावंत
वा साहेब! आठवड्याभरात तुम्हाला मुंबईचे रस्ते माहीत पडलेड्रायव्हर घोरपडे आश्चर्यचकित चेहेर्यानी उद्गारला. घोरपडे ला मुंबई तोंडपाठ होती पण इन्स्पेक्टर सावंत हे मुंबई ला नवीन होते. नुकतेच ते स्पेशिअल ट्रान्स्फरवर जॉईन झाले होते. त्यामुळे घोरपडे ला आश्चर्य वाटणे साहजिकच होते.
घोरपडे. तुमच लव्ह की अरेंज मैरेज?” सावंत नी घोरपडे ची फिरकी घ्यायचे ठरविले.
आंकाय साहेब? अरेंज मैरेज साहेबसावंत साहेबांच्या प्रश्नामुळे घोरपडे एकदम चपापला.
काय रेमग पहिल्या रात्रीच बायकोचा इतिहास भूगोल तपासून बघितलास का नाहीस?!…आं?” सावंत भुवया उडवत गमतीने घोरपडे ला म्हणाले. सावंत साहेबांच्या अश्या अचानक फिरकी गोलंदाजीने घोरपडे ला हसावे कि रडावे तेच कळेनासे झाले.
काय साहेब. तुम्हीपण कधी कोणाची विकेट काढाल नाघोरपडे नी चक्क थोडेसे लाजत गालातल्या गालात हसत हो म्हटले. त्यावर इन्स्पेक्टर सावंत मागे बसलेले सब इन्स्पेक्टर शिंदे आणि कॉन्स्टेबल वाळूंज हसायला लागले.
फर्स्ट नाईट! फर्स्ट नाईट ची मजाच वेगळी असते. अरे मी जेंव्हा मुंबई ला आलो ना तेव्हा फर्स्ट नाईटलाच मुंबई चा सगळा इतिहास भूगोल पाठ करून घेतला. मुंबई ची सगळी लफडी, सगळे रस्ते माहीत करून घेतलेसावंत जोशात सांगू लागले.
इकडचे सगळे भाई, मटका किंग, रेड लाईट डॉन सगळ्यांची कुंडली पाठ करून टाकली. पहिल्या रात्रीच ठरविले की आपले फर्स्ट टार्गेट कोण असणार आहे ते. होम मिनिस्ट्री नी  स्वतः छोटा पठाण चे टार्गेट अप्रूव्ह केले होते. काय?” सावंत साहेब अंगावर उडालेले पाण्याचे शिंतोडे पुसत म्हणाले. बाहेर पावसाची रीप रिप अजूनही सुरूच होती.
पण सावंत साहेब. तुम्हाला या छोटा पठाण बद्दल कोणी टीप दिली?” बर्याच वेळेपासून शिंदेंच्या मनामध्ये घोळत असलेल्या प्रश्नाला वाचा फुटली.
अरे आपला तो सलीम फकीर आहे नातो चरसी. त्यानेच आज पहाटे फोन करून सांगितलेसावंत
साला हा छोटा पठाणपाच वेळा माझ्या हातातून सुटला होता. पण तुम्ही ह्यावेळी मात्र त्याचा बरोबर एन्काउंटर केला. भडव्याच्या डोक्यातच साहेबांनी गोळ्या घातल्या. साल्याला हलायला सुद्धा चान्स भेटला नाहीउशिरा का होईना पण छोटा पठाणला अखेर ठेचल्याचा आनंद साहजिकपणे शिंदे ला झाला होता.  
सावंत साहेब. आल्या आल्या पहिल्या आठवड्यात छोटा पठाण चे एन्काउंटर! हे मिडिया वाले काय तुम्हाला आता सोडणार नाहीत. तुम्हाला एकदम साधू आगाशे बनवून टाकणार बघा”  कॉन्स्टेबल वाळूंज हळूच दबक्या आवाजात म्हणाला.
साधू आगाशे?” सावंत एकदम बुचकळ्यात पडले.
अब तक छप्पन सिनेमातला नाना पाटेकर होकॉन्स्टेबल वाळूंज नी लागलीच त्याचे फिल्मी ज्ञान प्रगट केले.
साहेब मुलुंड पोलिस स्टेशन आले!घोरपडे नी गाडी मुलुंड पोलिस स्टेशन च्या भव्य प्रवेशद्वारातून आत आणली.
पहाटेपासून पोलीसांचे हे चार शिलेदार एन्काउंटर च्या कामगिरीवर जे बाहेर पडले होते ते आता कुठे पोलिस ठाण्यात परत आले होते. मुसळधार पावसात चिंब भिजणारी वर-वर अगदी शांत वाटणारी मुंबई गेल्या अनेक महिन्यानपासून एका भयानक क्राईम सिंडीकेट च्या जाळ्यात अडकलेली होती. मुंबईतील बरेच मोठे मोठे उद्योगपती, बिल्डर्सना ह्या सिंडीकेटनी गिळून टाकले होते. गुन्हेगारीचे प्रमाण अचानक वाढलेले होते. मुंबईतील नोकरीदार लोकांचे जगणे अवघड होऊन बसले होते. हे क्रिमीनल लोकं कुठे कधी गोळीबार करून रस्त्यावर रक्ताचे पाट वाहतील हे सांगायचा नेम न्हवता. ह्या सिंडीकेट चा ब्रेन कोण आहे ह्याचा पोलिसांना अजून थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे अखेर मुख्य-मंत्र्यांच्या आदेशावरून इन्स्पेक्टर सावंत यांची मुंबई येथे तडकाफडकी बदली करण्यात आलेली होती. त्यांच्यावर मुंबई मधील हा गुन्हेगारीचा अचानक वाढलेला कॅन्सर समूळ उच्चाटन करण्याची जबाबदारी टाकण्यात आलेली होती. म्हणतात ना एव्रीथिंग इझ फ़ेअर ईन लव्ह एंड वॉर. एंड धीस वॉज वॉर!
पोलीस ठाण्यात आल्याआल्या बाजूच्या टपरीतून चहा नावाच्या उकळत्या रसायनानी भरलेले कळकट ग्लासेस आणण्यात आले. रंग उडालेली खूर्ची खेचून सावंत साहेब आपल्या जागेवर बसले.
ट्रिंग ट्रिंग ट्रिंगमुलुंड पोलीस स्टेशन मधील फोन खणखणला
मुलुंड पोलीस स्टेशनकॉन्स्टेबल वाळुंज उच्चं स्वरात फोनवर डाफरला
हॅलो. मी सलीम. सावंत साहेब आहेत का?” फोनवरील माणसाने नशेने धुंद झालेल्या स्वरात विचारले
हा आहेत. थांबा जरावाळुंज
सावंत साहेब. सलीम चरसी फोनवर आहेवाळुंज यांनी फोनवर हात ठेवला सावंत साहेबांकडे फोन दिला.
काँग्रॅच्युलेशन सावंत साहेब. इनकॉउंटर नाइसली डनसलीम नी हसून सावंत साहेबाचे अभिनंदन केले. एका मस्त आलिशान फाईव्ह स्टार हॉटेलच्या स्वीट मध्ये सलीम त्याच्या गुबगुबीत सोफ्यावर मस्त पैकी रिलॅक्स होऊन बसलेला होता. समोरच्या नक्षीकाम केलेल्या कॉफी टेबलावर हेरॉईन ची पावडर सरळ रेषेत चार भागात विभागून ठेवलेली होती. ती पावडर नाकामध्ये खेचण्यासाठी बाजूला एक छोटीशी पुंगळी ठेवलेली होती. पुंगळीच्या बाजूला स्मिथ एन्ड वेसन ह्या इंपोर्टेड ब्रॅण्डची फुल्ली लोडेड  हॅन्ड गन रुबाबात लोळत पडली  होती.  
पुढची इन्फॉर्मेशन कधी मिळणार?” सावंत
सलीम नी पुंगळीमधून नाकामध्ये कोक खेचला. कोक ची कीक साट्कन त्याच्या मेंदूमध्ये घुसली. त्या किक ने सलीम ला आनंदाच्या एका नवीन लाटेवर स्वार केले.
अजून दोन दिवस द्याआनंदाच्या नवीन लाटेवर आरूढ होत सलीम बेफ़िकीरपणे म्हणाला.
ठीक आहेसावंत साहेबानी फोन ठेवून दिला.
पावसामुळे आभाळ दाटून आले होते. अजूनही पावसाचा जोर कमी होण्याची काहीही चिन्ह दिसत नव्हती. पावसाच्या सततच्या माऱ्यामुळे मुलुंड पोलीस स्टेशन ची इमारत शेवाळी रंगाची झाली होती.

दूरवर पावसाकडे नजर लावून वाफाळणाऱ्या चहाचे घोट घेत सावंत साहेब विचारांच्या चक्रवहयुवात हरवून गेले.



प्रकरण : पनवेल लॉकप


पनवेल लॉकप मध्ये एक अठरा वर्षाची नुकतेच लग्न झालेली तरुणी भितीनी चळाचळा कापत उभी होती. सोनचाफ्यासारखी नितळ कांती. कमनीय बांधा. कपाळावर भले मोठे कुंकू. कॉन्स्टेबल सावित्री बाईंनी तिला हाताला धरून सब इन्स्पेक्टर राणें समोर उभे केले होते.
अहो बाई कशाला हीला इथे आणलेत? अहो तुम्हाला माहीत नाही का की आपल्या लॉकप मध्ये त्या येडा भास्करला बंद करून ठेवलेले आहे ते? होम मिनिस्टर निकम साहेबानी स्ट्रीक्ट ऑर्डर देउन ठेवल्या आहेत की जो पर्यंत तो येडा भास्कर आपल्या लॉकप मध्ये आहे तो पर्यंत कोणालाही ह्या लॉकप मध्ये आणायचे नाही. ह्या गँगस्टर लोकांचा नेम नाही. त्यांच्यापैकीच कोणालातरी आपल्या लॉकप मध्ये पाठवतील आणि येडा भास्कर चा गेम करून टाकतीलसब इन्स्पेक्टर राणें कपाळावर आठ्या घालत सावित्री बाईंकडे तक्रार करत म्हणाले.
अहो साहेब, त्या उरणच्या डी सी पी साहेबांची ऑर्डर होती. सगळ्या बाकीच्या लोकांना उरणच्याच  लॉकप मध्ये टाकले आहे. पण हीच काय ती शेवटची होती. तिथले लॉकप फूल झाल्यामुळेच ह्या सटवीला इथे पाठवलेसावित्रीबाई म्हणाल्या. आता डी सी पी साहेबांची ऑर्डर  म्हणजे काहीतरी करणे भाग होते. राण्यांनी वैतागून ड्रॉवर मधून रजिस्टर बाहेर काढले.
बर ठीक आहे. बोला. काय नाव आहे बाईंचे?” राणे यांनी रजिस्टर उघडत विचारले.
बाई. काय नाव हाय तुझं?”  कॉन्स्टेबल सावित्री बाईंनी मारक्या म्हशींप्रमाणे तिला विचारले.
मी कमला. पण साहेब मी काय नाय केले साहेब. मला कशाकरता इथे आणले साहेब? मी माझ्या नवर्या करीता जेवणाचा डबा द्यायला आले होते साहेब.कमला काकुळतीला येऊन गयावया करत म्हणाली.
काय हो सावित्री बाई काय चार्ज आहे हीच्यावर?” राणेंनी भुवया उंच करून विचारले.
साहेब. डान्स बार च्या रेड मध्ये सापडली. डान्स बार च्या एका बेड रूम मध्ये पलंगावर झोपलेली होती. रंडी आहे साहेब ही रंडी. धंदा करताना पकडली गेलीसावित्री बाईं कमला कडे तुच्छतेनी बघत म्हणाली.
रंडी? दिसायला तर चांगल्या घरातील वाटते. काय हो बाई खरे आहे का हे?” राण्यांनी कमला कडे बघत खडसावून विचारले.
नाही साहेब नाही. ह्या बाई खोटे बोलत आहेत. तसं काहीच नव्हते. मी माझ्या नवऱ्याची वाट पाहत होते.कमला काकुळतीला येऊन म्हणाली.
डान्स बार मध्ये नवऱ्याची वाट पाहणारी पाहिलीच बाई भेटली. बाई! पोलिसांशी खोटं बोलू नका. फार महागात पडेल तुम्हालाराण्यांचे टाळकं सरकायला सुरवात झाली होती.
अहो नाही हो. मी खरंच बोलते आहे. माझा नवरा त्या कंपनी मध्ये इलेक्ट्रीशियन चे काम करतो. त्यालाच जेवणाचा डबा द्यायला मी आले होते. त्या कंपनीच्या मालकानेच मला आतल्या खोलीत थांबायला सांगितले होते. पण बराच वेळ झाला माझा नवरा आलाच नाही म्हणून माझा जरा डोळा लागला. वाटल्यास तुम्ही माझ्या नवऱ्याला विचारा साहेब.कमला
तुम्ही कंपनी कंपनी काय करताय? तिथे गेल्यावर तो डान्स बार आहे हे तुम्हाला कळले नाही का?” राण्यांनी भेदकपणे कमलाच्या डोळ्यात बघत विचारले.
मला काय म्हाईत काय आहे ते! मी काय डान्स बार मध्ये रोज जाते काय की मला कळेल की तो डान्स बार आहे ते?” कमला ने तिचे कोणी ऐकत नाहीये हे बघून जरा रागानेच उलट उत्तर दिले.
झाले! राणे साहेबांचे टाळकं पूर्णपणे फिरायला हेच निमित्त झाले.
बाई. तोंड आवरा. तुमचे काय म्हणणे आहे आम्ही काय डान्स बार मध्ये रोज जातो का काय! पोलीस चांगले वागतात म्हणून काय पोलिसांवर वाटेल ते आरोप करायचे का काय?!” राणे संतापून ओरडले. राणें चिडलेले आहेत हे बघून सावित्री बाईंना जोश आला. त्यांनी चार पाच थोबाडीत ठेउन कमला च्या कानाखाली चांगलाच जाळ काढला.
आत टाका सालीला. नंतर बघून घेऊराण्यांनी फर्मान सोडले. रजिस्टर मध्ये कमलाच्या नावाची एंट्री करताच तिला स्त्रियांच्या लॉकप मध्ये बंद करण्यात आले. कमला पोलिसांच्या मारामुळे एकदम घाबरून गेली होती. लॉकप मध्ये बंद केल्यावर ती मटकन खालीच बसली. कित्येक तासात अन्नाचा एक कण पोटात नसल्यामुळे तिला ग्लानी यायला लागली. त्या ग्लानीमुळे तिची शुद्ध कधी हरपली ते तिला कळलेही नाही. स्त्रियांच्या लॉकप मध्ये कमला शिवाय कोणीच नव्हते. तिथे पूर्ण अंधार असल्यामुळे बाहेर कोणालाच कमला ला काय झालंय हे कळायला मार्ग नव्हता.
ट्रिंग ट्रिंग ट्रिंग
ट्रिंग ट्रिंग ट्रिंग
पनवेल लॉकप मधील फोन खणखणला. रात्रीचे अकरा वाजून गेले होते. पोलीस स्टेशन मध्ये फक्त राणे साहेब आणि त्यांचे दोन सहकारी ड्युटी वर होते. राणे साहेबांचा रात्रीच्या जेवणाचा डबा यायला आज फारच उशीर झाला होता. पोटातील भुकेमुळे राणे अस्वस्थ होते.  
पनवेल पोलीस स्टेशन. सब इन्स्पेक्टर राणें स्पिकिंगराण्यांनी उच्चं रवात फोन मध्ये गर्जना केली.
निकम साहेबाना बोलायचे आहे...सेक्रेटरी पाटील यांचा आवाज ऐकल्यावर राणे एकदम कापसासारखे मऊ झाले.
निकम बोलतोय. सब इन्स्पेक्टर राणें?” होम मिनिस्टर निकम साहेबांचा घनगंभीर आवाज फोन मध्ये घुमला.
येस सर. जय हिंद साहेब”  जणूकाही निकम साहेब समोर येऊन उभे आहेत असे समजून खाड्कन सॅल्यूट ठोकत राणें अदबीनं म्हणाले. निकम साहेबाचा दराराच तसा होता. कॉन्स्टेबल पासून कमिशनर पर्यंत सगळे जण निकम साहेबांना टरकून असायचे.
कुठपर्यंत केस आली आपली? त्या येडा भास्कर नी अजून तोंड उघडले की नाही?” निकम साहेबांनी त्यांच्या दमदार आवाजात विचारणा केली.
नाही साहेब. गेले दोन दिवस त्याला खायला प्यायला दिलेले नाही. तरी साल्याने अजून तोंड उघडलेले नाही. पोलिसांची थर्ड डिग्री कशी असते हे बघितल्यावरच तो तोंड उघडणार साहेब. पण तुमची संमती असेल तरच आम्ही थर्ड डिग्री वापरू.राण्यांना येडा भास्कर ला फोड फोड फोडायचे होते. पण निकम साहेबानी सक्त ताकीद दिलेली होती की काहीही झाले तरी येडा भास्करला हात लावायचा नाही म्हणून.
सब इन्स्पेक्टर राणें आणि निकम साहेब बऱ्याच वेळ फोनवर येडा भास्कर केस च्या बाबतीत बोलत होते. तेवड्यात राण्यांचा जेवणाचा डबा आला. फोनवर बोलता बोलता राण्यांनी डबा त्यांच्या टेबलावर ठेवण्याची खूण डबेवाल्याला केली. डबेवाल्यानी डबा उघडून टेबलावर व्यवस्थित मांडून ठेवला राणे साहेबाना सलाम मारून तो लागलीच निघून गेला. तेव्हड्यात राण्यांचे फोन वरील संभाषण आटोपले. डब्यातील मच्छि च्या वासाने राण्यांची भूक पुन्हा एकदा खवळली जोशाने ते जेवणावर तुटून पडले.
राणे साहेबांच्या टेबला च्या उजव्या बाजूला जनरल लॉकप होते. तिथे  येडा भास्कर ला कैद करून ठेवलेले होते. टेबला च्या डाव्या बाजूला स्त्रियांचे लॉकप होते. पण तेथील लाईट्स गेल्यामुळे तिथे सगळा अंधारच होता. त्याच लॉकप मध्ये कमला बेशुद्ध होऊन पडलेली होती. पण लॉकप मध्ये अंधार असल्यामुळे कोणालाच तिच्या अस्तित्वाची जाणीव नव्हती. जनरल लॉकप मध्ये येडा भास्कर ला एका खुर्चीला बांधून बसवून ठवलेले होते. त्याच्या बरोबर डोक्यावर हाई वोल्टेज चा पिवळा दिवा टांगून ठेवला होता. तो दिवा सतत चालू ठेवलेला होता. त्या दिव्याच्या प्रकाशामुळे आणि त्यातून निघणाऱ्या गर्मी मुळे येडा भास्कर ची मान पाठ डोकं सगळं चांगल्यापैकी भाजून निघालेले होते. तहान तर त्याला सतत लागत होती. दोन दिवस पाणी आणि अन्न मिळाल्यामुळे त्याची अवस्था केविलवाणी झालेली होती. त्यात राण्यांच्या डब्यातून येणाऱ्या मच्छि च्या वासाने तर त्याची भूक आणखीनच खवळली. राण्यांना अगदी हेच हवे होते. त्यांनी त्यांचा मच्छि चा डबा उचलला. चालत ते येडा भास्कर च्या लॉकप समोर आले तो डबा त्यांनी तिरका करून आतील मच्छि येडा भास्कर ला दाखवली.  मच्छि चा वास अजूनच तीव्रपणे लॉकप मध्ये शिरला येडा भास्कर चे तोंड भुकेमुळे आणखीन केविलवाणे झाले.
येडा भास्कर. असा येडा बनून पेढा खाऊ नकोस. जे काय तुला अब्दुल कसाई बद्दल माहीती आहे ते पटकन सांगून मोकळा हो. तू मी म्हणतो असे केलेस तर माझ्या डब्यातली मच्छि तुला देईन. काय?” राण्यांनी कुत्सितपणे  येडा भास्कर ला डिवचले.
भोसडीच्या. एकदा मला बाहेर पडुदे, नाही ती मच्छि एक दिवस तुझ्या गांडीत घातली तर येडा भास्कर नाव लावणार नाही.येडा भास्कर नी लॉकप मध्ये डरकाळी फोडली.
सुम्भ जळाला पण पीळ काही जात नाही. येडा भास्कर कसं होणार रे तुझंराण्यांनी तोंडानी चक चक आवाज करत येडा भास्कर च्या धमकीकडे दुर्लक्ष केले आणि परत आपल्या टेबलावर बसत मच्छि चा आस्वाद घेण्यामध्ये गर्क झाले.
भोसडीच्या, रांडेच्या, मादरच्योत.अश्या अनेक शिव्यान्ची लाखोली वाहत येडा भास्कर लॉकप मध्ये गुरगुरत बसला.
मच्छि च्या वासामुळे म्हणा कींवा शिव्यानच्या लाखोलीमुळे म्हणा पण कमला ला थोडी थोडी जाग यायला लागली. तिने सावकाश डोळे उघडून इकडे तिकडे बघितले. पहिले काही सेकंद तिला कळलेच नाही की ती नक्की कुठे आहे ते. पण हलण्याचे त्राण उरले नसल्यामुळे ती तशीच काही काळ पडून राहिली. काही वेळ झाल्यावर तिला आठवले की ती तिच्या नवऱ्याला डबा द्यायला म्हणून बाहेर पडलेली होती. पण जिथे तिला तिच्या नवऱ्याने यायला सांगितले होते तो डान्स बार होता. ती आतमध्ये नवऱ्याची वाट बघत असताना नेमकी त्या डान्स बारवर पोलिसांची रेड पडली होती. पोलिसांनी तिला इतर धंदेवाल्या बायकांतील एक असे समजून पकडून आणले होते. तिला झाला प्रकार सगळा आठवला. तिला हेही लक्षात आले की तीला पनवेलच्या पोलीस स्टेशन च्या लॉकप मध्ये बंद केलेले आहे. किती वाजले असतील आता? नवऱ्याला दुपारचा डबा मिळाला असेल की तो बिचारा अजून पर्यंत उपाशीच असेल? मला तो इथून सोडवायला कसा काय आला नाही अजून? अशा नाना प्रश्नांनी तिला भंडावून सोडले. कमला नी पूर्ण जोर एकवटवला उठायचा प्रयत्न केला. तिला उठता आले नाही पण लॉकप च्या भिंतीला खेटून तिला बसता आले. बसल्या बसल्या तिला सब इन्स्पेक्टर राणे टेबलावर पाय टाकून आरामात बसलेले दिसले. डबा खावून झाल्यावर त्यांनी वाकून ड्रॉवर मधील दारूची बाटली काढली थोडीशी दारू रिकाम्या चहाच्या ग्लासात भरली. खिशातून सिगारेट चे पाकीट काढले माचीस नि सिगारेट शिलगावत ते उठून उभे राहिले. उभे राहिल्यावर त्यांनी दारूचा ग्लास हातामध्ये घेतला पुन्हा ते येडा भास्कर च्या लॉकप समोर चालत जाऊन उभे राहिले. येडा भास्कर ला दारूचा ग्लास दाखविला नैवैद्य दील्यासारखे दोन शिंतोडे त्याच्या लॉकप मध्ये उडविले.
जय शिव शंभो! येडा भास्कर तुला आणि तुझ्या सारख्या भुतांना नैवैद्य अर्पण...राण्यांनी आसुरी आनंद घेत येडा भास्कर ला पुन्हा डिवचले. येडा भास्कर ला चिअर्स करून एका दमात राण्यांनी दारूचा ग्लास रिकामा केला. येडा भास्कर चे डोळे रागामुळे आता अंगार ओकायला लागले होते.
अरे येड्या. तुला किती वेळा सांगितले की काय ते पटकन सांगून टाक आणि मोकळा हो. तू जरका पोलिसांना मदत केलीस तर तुला आम्ही माफीचा साक्षीदार बनवू. एकत्र बसून आपण मच्छि खाऊ. दारू पिऊ. येड्या! तुझे लाईफ बनवून टाकतील आमचे साहेब. काय?” राण्यांनी पुन्हा एकदा येडा भास्कर ला समजवायचा प्रयत्न केला.
ट्रिंग ट्रिंग ट्रिंग
तेव्हड्यात पनवेल पोलीस स्टेशन मधील फोन खणखणला. राणे साहेबांनी फोन उचलला. काही मिनिट बोलणं झाल्यावर राणे साहेबांनी ओके म्हणत गंभीरपणे फोन ठेवून दिला. फोन ठेवल्यावर ते पुन्हा येडा भास्कर च्या लॉकप समोर त्यांच्या कमरेला खोचलेल्या ४५ मिमी गन वर हात ठेवून  उभे राहिले.  
साल्या राणे. तुम्हा पोलिसांच्या जातीला मी चांगलाच ओळखून आहे. मला येडा भास्कर म्हणतात. काय म्हणतात? येडा भास्कर म्हणतात मला. येडझव्या इन्स्पेक्टर! तू काहीपण उपट. पण तू माझं काय पण वाकडं करू शकत नाहीस. भोसडीच्या तू स्वतःला काय देव समजतोस काय? अरे यहा तो खुदा ओंके खुदा मेरे पैर पकडते है. साले तू क्या चीझ है?” येडा भास्कर छाती फुगवून उद्दामपणे म्हणाला.
येडा भास्कर! तुझ्या त्या खुदा लोकांनीच जमिनीत खुदाई करून त्यात तुला गाडायची ऑर्डर काढली आहे. अभी मरते समय उन्ही खुदाओंके खुदाओंको याद कर भोसडीके!राण्यांनी त्यांची गन डाव्या हातामध्ये धरून येडा भास्कर कडे रोखली. येडा भास्कर चा चेहरा भितीनी एकदम काळाठिक्कर पडला. राणेसाहेबानी शांतपणे ट्रीगर दाबला. जर्मन बनावटीच्या ४५ मिमी गन मधून कडाडत सुटलेल्या गोळीने क्षणार्धात येडा भास्कर च्या कपाळाचा वेध घेतला. कपाळातून आरपार जात मेंदूचा चेंदामेंदा करत गोळी मागच्या भिंतीवर जाऊन आदळली. गोळीच्या जबरदस्त इम्पॅक्ट मुळे तो खुर्चीसकट उडाला मागे पाठीवर पडला. गोळीचा इम्पॅक्ट इतका जबरदस्त होता की त्याच्या मेंदूचा अर्धा भाग उडून प्लास्टर मारल्यासारखा मागच्या भिंतीवर चिकटला.  पाठीवर पडून तडफडत तोंडातून रक्त ओकत शेवटचे आचके देत येडा भास्कर पाणी पाणी करायला लागला. राण्यांनी लॉकप उघडला. ते त्याच्या अगदी जवळ गेले.  त्याच्याकडे तुच्छपणे बघत त्यांनी उरलेल्या सगळ्या गोळ्या येडा भास्करच्या अंगात रिकाम्या केल्या. फायरिंग च्या आवाजामुळे बाहेर उभे असलेले दोन्ही कॉन्स्टेबल धावत धावत आतमध्ये आले. झाला प्रकार लक्षात आल्यावर दोघेही राणे साहेबांकडे प्रश्नार्थकपणे बघू लागले.
काय टेन्शन घेऊ नका. एकदम मोठ्या साहेबांकडून ऑर्डर आली होती. उद्या येडा भास्कर बेल वर सुटणार होता. त्यामुळे आजच्या रात्रीतच येडा भास्कर ला संपवायची ऑर्डर होती.  मग काय त्याला इथेच उर्जेन्ट मध्ये संपवायला लागलेराणे आपल्या खुर्चीत बसत म्हणाले.

कमला ला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. माणसं इतकी क्रूर असू शकतात ह्याची तिला पहिल्यांदाच जाणीव झाली. तडफडत तोंडातून रक्त ओकत मरणासन्न अवस्थेमध्ये  पडलेल्या येडा भास्कर कडे बघून तिला भयंकर शॉक बसला. इतके भयंकर दृश्य आतापर्यंत तीनी कधीच बघितलेले नव्हते. त्या शॉक मुळे तिला पुन्हा भोवळ यायला लागली. लॉकप चे छत भिंती सगळंच तिच्या डोळ्यासमोर गोल गोल फिरायला सुरवात झाली. त्या गोल गोल भोवऱ्यामध्ये फिरत तिचे मन एकदम भूतकाळात शिरले. तिला आपले माहेर चे घर आठवले. कोल्हापूरच्या बाजूलाच एका गावात तिचे वडिलोपार्जित छोटेसे दगडी घर होते. घरातल्या शेणानी सारवलेल्या भिंतींचा वास कमला च्या नाकामध्ये अजूनही ताजा होता. आईच्या मायेची उब तिच्या घराच्या प्रत्येक कोनाड्यामध्ये,  चुलीवरच्या प्रत्येक भाकरी मध्ये,  आईने दिलेल्या प्रत्येक फटक्यांमध्ये होती. त्या मायेच्या उबेमुळे कमला ला कायमच तिच्या माहेरी खूप सुरक्षित वाटत असे. तिचे बाबा सुतारकाम करून जे काही तुटपुंजे पैसे मिळवायचे ते घराचा खर्च चालवायला द्यायचे. तुटपुंज्या पैशात घर चालवण्याचे अजब कसब कमला च्या आईकडे होते. वेळ पडली तर स्वतः उपाशी राहून कमलाला मात्र रोज भाकरी खायला मिळेल ह्याची काळजी ती माउली घ्यायची. ती बिचारी कधीच शाळेत गेली नाही पण कमला नी मात्र शाळेत शिकावे मोठे व्हावे असे तिला नेहमी वाटे. मुलीच्या जातीला प्रगत व्हायचे असेल पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जायचे असेल तर शिक्षण हेच एकमेव शस्त्र आहे अशी तिची भाबडी समजूत होती. त्यामुळे तिने कमलाला शिकण्या करीता खूप प्रोत्साहन दिले. कमला चे वडील तिचे लग्न लहानपणीच लावून द्यायला निघालेले होते. मुलीच्या जातीने शेतात काम करावे नवऱ्याची काळजी घ्यावी ह्या शिक्षण बिक्षणात काही पडू नये अशी त्यांची धारणा होती. पण कमला च्या आईचे स्वप्न मोठे होते. तिला कमला ला मोठे करायचे होते. शहरात पाठवायचे होते. शहरात तिने नोकरी करावी पैसे मिळवावेत अजून पुढे जावे असे तिला वाटे. त्यामुळे तिच्या वडिलांची नाराजी ओढवून घेऊन तिने कमला चा बालविवाह होऊन दिला नाही. कमलानेही शिक्षणात खूप रस घेतला. ती चक्क दहावी च्या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यात पहिली आली. एका अत्यंत गरीब घरातील खेड्यात राहणारी मुलगी पहिली आली म्हणून तिचा तिच्या आई वडिलांचा बऱ्याच ठीकाणी सन्मान करण्यात आला. आईला तर इतका आनंद झाला की तिला आभाळ ठेंगणे झाले. कमला ला वाजतगाजत कोल्हापूरच्या एका प्रतिष्ठित कॉलेज मध्ये एकरावीला ऍडमिशन देण्यात आली. पण कमला च्या नशिबात काही वेगळेच लिहून ठेवलेले होते. काही दिवसात अचानक तिच्या आईचे निधन झाले. बाबांना वयपरत्वे सुतारकाम मिळणे जवळजवळ बंदच झाले होते. तिच्या आईने जे काही थोडेसे पैसे साठवून ठेवलेले होते ते असे किती दिवस त्या दोघांना पुरणार होते. त्यामुळे तिच्या वडिलांनी तिचे लग्न लावून द्यायचा निर्णय घेतला. थोडंफार कर्ज काढून तातडीने कमला चे लग्न लावून देण्यात आले. कमलाला तर तिच्या नवऱ्याशी लग्नाआधी भेटायचा वेळच देण्यात आला नाही. एव्हडेच काय तर कमला च्या बाबानी तिचा नवरा नक्की काय करतो कुठे काम करतो कसा आहे ह्याची साधी चौकशि देखील करण्याचे कष्ट घेतले नाहीत. त्याच्या दृष्टीने कमला नावाच्या एका जबाबदारीचे ओझे खांद्यावरून उतरविणे हीच एकमेव महत्वाची गोष्ट होती. एकदा लग्न झालं कि होईल सगळे अड्जस्ट. आमच नाही झालं सगळं अड्जस्ट अशी त्यांची भोळी समजूत होती. तिचा नवरा पनवेल सारख्या शहरात इलेकट्रीशियन ची कामे करतो राहायला त्याची स्वतःची खोली आहे एव्हड्या जुजबी माहीतीवर कमला चे लग्न लावून तिचे वडील मोकळे झाले. कमला लग्न झाल्यावर पनवेल मध्ये एका छोट्याश्या चाळीत राहायला आली. पण एका शांत खेड्यात आयुष्य गेल्यामुळे पनवेल मधील गर्दीची प्रचंड ट्रॅफिक ची तिला अजिबात सवय नव्हती त्यामुळे तिला एकदम दडपण आले होते. त्यात तिचा नवरा राजेश कायम कामावर बाहेरच असायचा. कमला त्याला रोजचा जेवणाचा डबा करून द्यायची पण राजेश ची   इलेकट्रीशियन ची कामं उरण, नवी मुंबई, ठाणे अश्या वेगवेगळ्या ठिकाणी असायची. त्यामुळे दरवेळेस त्याला डबा घेऊन जाता येत नसे. बऱ्याच वेळा कमलालाच राजेश चा डबा घेऊन तो ज्या ठिकाणी कामाला असेल तिथे जावे लागे. सगळे सुरळीत सुरु होते. कमला आता शहरी वातावरणात बऱ्यापैकी रुळली होती. आणि अश्याच एके दिवशी तिला राजेशनी एका उरण मधील पत्त्यावर डबा पोहोचवायला सांगितले. तो नेमका डान्स बार निघाला आणि कमला तिच्या दुर्दैवाने त्यावर पडलेल्या रेड मध्ये पकडली गेली.  
कमळे. बेटा तुला तहान लागली असेल ...वाईच जरा ह्ये पानी पी म्हंजी जीवाला बरं वाटेल बाळ...कमला ची आई कमलाच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत म्हणाली.
आये... आये... कुठे होतीस तू इतक्या वेळ... पानी...पानीकमलाला तिच्या आईचा प्रेमळ चेहरा डोळ्यासमोर दिसू लागला.
ह्ये बघ पानी तुझ्या बाजूलाच हाहे बघ... खोलीत अंधार हाहे पण हात जरा लांब कर म्हंजी तुला ते मिळेलकमला ची आई तिला प्रेमळ पणे सांगत होती. आईकडे बघून कमला च्या डोळ्यात अश्रूंची धार लागली पण जसे कमला नी डोळे उघडायचा प्रयत्न केला तसा आईचा चेहरा डोळ्यासमोरून हळू हळू अदृश्य झाला. शुद्धीवर येत अंधाऱ्या लॉकप मध्ये भिंतीला खेटून बसत कमला ने हाथ लांब करून जमिन चाचपायला सुरवात केली. तिला खरोखरच बाजूला महिला कैद्यांसाठी ठेवलेला पाण्याचा माठ लागला. माठाचा गार स्पर्श होताच तीचे शुष्क झालेले ओठ विलग झाले. तिच्या कोरड्या पडलेल्या तहानलेल्या गळ्याला पाण्याची ओढ लागली. पाण्यासाठी तहानलेल्या कमला ने क्षणाचा विचार करता तो माठ स्वतःकडे ओढून घेतला गटागटा पाणी प्यायला सुरवात केली. पण तिथेच फार मोठा घात झाला. माठाच्या आवाजामुळे राणे आणि त्यांचे दोन्ही कॉन्स्टेबल एकदम चपापले. त्या अंधाऱ्या लॉकप मूळे आणि आत्तापर्यंत निपचित पडल्यामुळे कमला त्या लॉकप मध्ये बंद आहे ही गोष्ट सगळे साफ विसरून गेलेले होते. राण्यांनी ड्रॉवर मधून चट्कन टॉर्च काढला अंधाऱ्या लॉकप मध्ये फोकस मारला. टॉर्चच्या प्रकाशात लॉकप च्या एका टोकाला भिंतीला खेटून बसलेली कमला त्यांना दिसली. टॉर्चच्या प्रखर प्रकाशामुळे कमला चे अंधारात सरावलेले डोळे दिपले. राण्यांच्या आज्ञेवरून त्या लॉकप मधला लाईट काढून दुसरा लाईट बसविण्यात आला. पुन्हा व्यवस्थित दिसायला लागल्यावर कमला ला तिचा जीव धोक्यामध्ये असल्याची एकदम जाणीव झाली. कारण तिनी येडा भास्कर चा मर्डर स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेला होता. त्याची डेड बॉडी अजूनही लॉकप मध्ये पडलेली तिला दिसत होती.
मला माफ करा साहेब. मला जाऊ द्या. मी कोणाला काहीपण सांगणार नाहीआता आपल्याला सुद्धा हे लोक मारून टाकणार या भितीनी कमला रडत काकुळतीला येऊन म्हणाली.
राणे साहेब. हीच ना ती रांड जी धंधा करताना पकडली गेली होती?” कॉन्स्टेबल सदाशिवनी दात विचकत राण्यांना विचारले.
सॉलिड आयटम आहे साहेब. एकदम खानदानी वाटते. लयी भारी माल आहेकॉन्स्टेबल दिपकने कमला च्या कमनीय शरीराकडे न्याहाळत म्हंटले. कुठल्या चांगल्या घरातल्या बाईला स्वतःचा रांड म्हणून झालेला उल्लेख आवडेल? कमलाला तर तिच्या आईने ताठ मानेने जगायला शिकवले होते. तिचे शिक्षण पूर्ण झालेले नसले तरी आज ना उद्या शिक्षण पूर्ण करायचा तिने निर्धार केलेला होता. दीपक ची घाणेरडी नजर तिला काट्यासारखी टोचली. तिचा रांड म्हणून केलेला उल्लेख मुंगळा डसल्याप्रमाणे तिच्या मनाला झोंबला.
फोद्रीच्या! रांड असेल तुझी बहीणकमला एक अस्सल कोल्हापुरी शिवी देत रागाने उसळून म्हणाली.
घाबरलेल्या मांजरीचे एकदम वाघिणीत रूपांतर झालेले बघून ही काही शांत राहण्यातली बाई नाही हे राण्यांनी ओळखले. हिने स्वतःच्या डोळ्यांनी राण्यांना येडा भास्करचा मर्डर करतांना बघितलेले होते त्यामुळे आज ना उद्या ही वाघीण नक्कीच आपल्याविरुद्ध तोंड उघडणार. जर का हीने तोंड उघडले तर सी.बी.आईवाले गचांडीला धरून राण्यांना तुरुंगाचा रस्ता दाखविणार हे उघड होते. त्यामुळे तिला संपवण्याशिवाय कुठलाच मार्ग राण्यांना दिसत नव्हता. त्यांनी तिला संपवायचा निर्णय घेतला कमरेला खोचलेली ४५ मिमी गन हातामध्ये घेऊन कमला कडे रोखली.
स्वतःकडे रोखलेली गन बघून कमला एकदम गर्भगिळीत झाली.
रात्रीच्या टाईमला  एकट्या बाईमाणसाला लॉकप मध्ये ठेवायला अलाऊड नाही. त्यात ह्या सटवीने येडा भास्कर चा मर्डर करताना आपल्याला बघितले आहे...हीला संपवण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाहीअसे म्हणत राण्यांनी ट्रीगर दाबला. पण त्या गन मधील सर्व गोळ्या त्यांनी येडा भास्कर च्या अंगात झाडलेल्या होत्या. गन रीकामी असल्यामुळे नुसताच ट्रीगर चा आवाज झाला. स्वतःवर वैतागून एक शिवी हासडत राण्यांनी बंदुकीचा दस्ताच कमला च्या डोक्यात हाणला. त्या प्रहारामुळे कमला लोळागोळा होत जमिनीवर पडली. तिचा पदर उडून बाजूला पडला. पाण्यामुळे ओल्या झालेल्या तिच्या नितळ गोऱ्या कमनीय देहाचे दर्शन सगळ्याच्या नजरेस पडले. चोळी ओली झाल्यामुळे छातीला घट्ट चिकटलेली होती. कमलाच्या गोऱ्या छातीचा उभार त्यातून स्पष्टपणे दृष्टी वेधून घेत होता. तिचे रसगुल्ल्यासारखे लुसलुशीत स्तन चोळी मधून अर्धे बाहेर डोकावत होते. साडी शरीराला चिकटली असल्याने तिच्या कमनीय नितंबांचा आकार स्पष्टपणे उठून दिसत होता. कामवासनेचा विंचू कडकडून तिघांना डसला. अवाक होऊन कमलाच्या मादक शरीराकडे लाळ गाळत ते तीन हैवान काही वेळ बघतच राहिले. राण्यांनी लगेच सिच्युएशन आपल्या ताब्यात घेतली त्यांच्या दोन्ही कॉन्स्टेबल्स ना पोलीस स्टेशन च्या बाहेर पहाऱ्यावर उभ राहायची आज्ञा दिली.
माझा काम झाल्यावर तुमचा नंबर...राण्यांनी सूचकपणे दोघांना एक डोळा मारत सांगितले. दीपक सदाशिव खिदळत हाताने किळसवाणी हालचाल करत एकमेकांना डोळा मारत पोलीस स्टेशन च्या बाहेर जायला निघाले. बाहेर गेल्यावर सदाशिव ने खिशातून तंबाखूची पूडी काढली. तंबाखू यथेच्छ मळून झाल्यावर तंबाखूची गोळी गालात ठेवत सदाशिव ने आजूबाजूला कोणी नाही ह्याची खात्री करून घेतली.
फायरिंग चा आवाज कुणाला ऐकू गेलेला दिसत नाही. बराय! नाहीतर ज्याम वांदे झाले असते नाही!दीपक टेन्शनमध्ये म्हणाला.
एव्हड्या पावसाच्या आवाजात कोणाला काय ऐकू येणार आहे? सगळे जण आपापल्या बायकांच्या तंगडी मध्ये तंगड अडकवून झोपलेले असणार राजासदाशिव ने डोळा मारून हसून म्हंटले.
च्यायला! आपल्या राणे साहेबाची चैन आहे. आतली बाई कसली भारी आहे नाई? एकदम ऐदान जनावर.सेक्स चा ऎटमबॉम्ब...”  दीपक चुळबुळत म्हणाला.
! असा तारेवर नको येउस...सिनिऑरिटी प्रमाणे राणे साहेबानंतर माझी टर्न आहेसदाशिव डोळे वटारत दीपक ला म्हणाला.
राणे कामवासनेच्या आगीने पेटून उठले होते......


click here to read rest of the novel online on Amazon.in